ज्येष्ठ महिलेचे हात-पाय बांधून 14 तोळे दागिन्यांची चोरी
सोलापूर, दि. 22, ऑगस्ट - पद्मानगरन्यू पाच्छा पेठेत राहणार्या गिरीजाबाई पाटील (वय 65) याच्या घरातून चोरांनी 14 तोळे सोन्याचे दागिने पळवले आहेत. एक मोबाईलही नेला आहे. विशेष म्हणजे चोरटे बाहेर जाताना त्यांचे हात-पाय बांधून अंगावर बेडशीट टाकून गेल्याचे समोर आले आहे. पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. पााटील या घरी एकट्याच असून त्यांची दोन्ही मुले पुण्यात असतात.
खिडकीच्या वाटेने घरात शिरलेल्या चोरांनी पाटील यांना मारहाण करून कपाटातील दागिने काढून घेतले. चोरी करून जाताना त्यांचे हातपाय बांधले. अंगावर बेडशीट टाकून गेले. हा भयानक प्रकार घडल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर घरी आले. दागिन्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे लाख रुपये होते. याबाबत पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांना विचारले असता, पाटील या घरी एकट्याच असतात. चोरटे खिडकीतून आत आले. काही संशयिताची नावे काढण्यात येत आहेत. लवकरच हा गुन्हा उघडकीस येईल असे पाटील म्हणाले.