Breaking News

टॉयलेट एक प्रेमकथेच्या निमित्ताने 1400 विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छ भारताची शपथ

ठाणे, दि. 24, ऑगस्ट - ठाणे महानगरपालिका आणि शहरातील विशेष शाळांमधील जवळपास 1400 विद्यार्थ्यांनीआज ’स्वच्छ भारत’ आणि ’स्वच्छ ठाणे’चा नारा  देत ’टॉयलेट: एक प्रेमकथा’ या वेगळ्या धाटणीच्याचित्रपटाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि या चित्रपटाचेदिग्दर्शक  नारायण सिंग यांनी आपली उपस्थिती लावून या चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेलाप्रोत्साहन देण्याचे काम केले.
ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र गो ग्रीन फौंडेशन, फ्रायडे फिल्मवर्क प्रा. लि., ठाणे सिटीझनफोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या टॉयलेट एक  प्रेमकथा या चित्रपटाच्याविशेष शोकरिता ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त(1) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(2)समीर उन्हाळे, ठाणे सिटीझन्स फोरमचे  निमंत्रक कॅस्बर ऑगस्टीन आदींनी उपस्थित राहूनविद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत केला.
स्वच्छ भारत पर्यायाने स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छ ठाणे या मोहिमेला बळ मिळावे तसेच याचेमहत्व शाळेतील मुलांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत आणि  अंतीमत: समाजापर्यंत पोहोचावेयासाठी महापालिका शाळा आणि विशेष मुलांच्या शाळांमधील जवळपास 1400 विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाच्या  विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त(1) सुनीलचव्हाण यांच्या उपस्थितीत  स्वच्छ भारत, स्वच्छ ठाणेची शपथ घेवून यापुढे स्वच्छतेचे दूत म्हणून काम करण्याची हमी महापालिका आयुक्तांना दिली.