Breaking News

मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार

औरंगाबाद, दि. 24, ऑगस्ट - शिक्षण साहित्य, कला, संस्कृती या सर्वच क्षेत्रात उत्तुंग कर्तबगारी गाजविण्याचे कार्य महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी केले आहे.  मराठी माती अशा ज्ञानवंत, गुणवंतानी सुगंधित केली असून त्याचा दरवळ जगभर पोहोचला आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच मान्यवरांना मा.कुलगुरु यांच्या हस्ते  जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाटयगृहात बुधवारी (दि.23) हा कार्यक्रम झाला. यामध्ये भुजंगराव कुलकर्णी (प्रशासकीय सेवा), न्यायमूर्ती  सी.एल.थूल (विधी), मुरलीधर शिंगोटे (पत्रकारिता), प्राचार्य डॉ.विश्‍वनाथ कराड (संशोधन) व डॉ.जगन्नाथ पाटील (शिक्षण) यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन  गौरविण्यात आले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.राजेश रगडे, विशेष कार्य अधिकारी डॉ.वाल्मिक सरवदे, विद्यार्थी विकास  संचालक डॉ.मुस्तजिब खान यांची उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आंबेडकर विद्यापीठाचा हा सन्मान म्हणजे सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचे भाग्य आहे. साधु-संताची व विचारवंताची भुमी  असलेल्या पुैले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेला मानून कार्य करणाछयांचा हा सन्मान आहे. पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे, अशा भावना  न्या.सी.एल.थूल यांनी व्यक्त केल्या.
जगात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विद्वानांच्या कार्याची बेरीज केली तरीही भारतीय तत्ववेत्यांची ताकद मोठीच आहे. संत ज्ञानेश्‍वर ते संत तुकारामांनी वारकरी संप्रदायाची  उभारणी केली. भगवान गौतम बुध्द आणि महात्मा गांधी या दोघांनी विश्‍वाला दिलेला शांतीचा आयुष्यभर अंगीकारला. कदाचित या कार्याचा गौरव म्हणून मिळेलाला  पुरस्कार अत्यंत विनम्रपणे स्विकारतो, असे डॉ.विश्‍वनाथ कराड यांनी पुरस्कार स्विकारताना म्हटले.
भारताच्या रक्षणासाठी स्वत:चे बलिदान 1971 मध्ये माझ्या वडीलांनी दिले, त्यावेळी मी आईच्या पोटात होतो. अशा या वीर पत्नीचा मुलगा म्हणून मिळालेला  पुरस्कार अत्यंत विन्रमपणे स्विकारतो, अशी भावना डॉ.जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत ‘व्हाईस ऑफ अशिया‘ ही मिळालेली माझी  ओळख आहे. अत्यंत वैभवशाली इतिहास असलेल्या भारताचे वर्तमान चिंताजनक आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य सुधारण्यासाठी उर्वरित जीवन व्यतीत करण्याचा  संकल्प मी या निमित्ताने करतो, असेही ते म्हणाले.
विद्यापीठाच्या स्थापनेपासून मी साक्षीदार असून ही प्रगती जवळून पाहिली आहे. सध्या मराठवाडयातील शालेय ते उच्च शिक्षणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.  मराठवाडयाच्या प्रगतीत शासकीय अधिकारी म्हणून सहभागी होता आले याचा आनंद आहे. आज हे सर्व आठवतांना मनस्वी आनंद होत आहे. चांगल्या कामाची  समाज दखल घेत असतो, त्यामुळे कार्यरत रहा, हाच माझा संदेश आहे, असे पुरस्कार स्विकारताना भुजंगराव कुलकर्णी म्हणाले.
रिसर्च प्रोफेसर पुरस्कार देणार
विद्यापीठात उत्कृष्ट संशोधन करणाछया संशोधक प्राध्यापकांना ‘रिसर्च प्रोपेैसर‘ म्हणून गौरविण्यात येणार आहे. यंदा डॉ.महेंद्र सिरसाठ, डॉ.के.एम.जाधव,  डॉ.सी.एच.गील डॉ.के.व्ही.काळे, डॉ.रामफल शर्मा, डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.बापू शिंगटे, डॉ.अनिकेत सरकटे यांनी गौरविण्यात येईल. शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या  हस्ते सन्मान करण्यात येईल. प्रत्येकी 25 हजारांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास डॉ.सर्जेराव ठोंबरे, नलिनी चोपडे, डॉ.नंदकुमार राठी, डॉ.एम.डी जहागीरदार, डॉ.सुधीर गव्हाणे, उध्दवबापू आपेगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.  सन्मानपत्राचे लेखन डॉ.दासू वैद्य, डॉ.वैैलास अंभुरे, डॉ.क्रांती व्यवहारे, डॉ.उत्तम अंभोरे, डॉ.भारती गोरे, संजय शिंदे यांनी केले. तर सन्मानपत्राचे वाचन प्रा.पराग  हासे, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.अपर्णा अष्टपुत्रे, डॉ.सोनाली क्षीरसागर यांनी केले. डॉ.समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.प्रदीप जब्दे यांनी आभार मानले. यावेळी  परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.राजेश रगडे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच अरविंद भालेराव, सचिन चव्हाण, यशपाल साळवे, दिनेश कोलते,  दीवाकर पाठक, प्रा.सचिन भालशंकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी अनिलकुमार सोनकांबळे व बाबा गाडे यांनी चार वर्षापुर्वीची गौतम बुध्दनाणी  प्रतिमा असलेलं नाणं कुलगुरु व न्या.थूल यांन भेट दिले.