20 वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदू व्यक्तीने मिळवले पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात स्थान
इस्लामाबाद, दि. 05, ऑगस्ट - 20 वर्षानंतर पाकिस्तान मंत्रिमंडळात हिंदू व्यक्तीला स्थान मिळाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांच्या नवीन मंत्रिमंडळातील सदस्यांनी शुक्रवारी शपथ घेतली. यामंत्रिमंडळात काही जुनेच सदस्य आहेत. तर काही नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात खासदार दर्शन लाल या हिंदू खासदाराचाही समावेश करण्यात आला आहे. मागील 20 वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच एका हिंदू नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी 44 खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 18 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
पाकिस्तानच्या चार प्रांताच्या समन्वयाची जबाबदारी खासदार दर्शन लाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. लाल हे 65 वर्षाचे असून व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. वर्ष 2013 मध्ये ते पीएमएल-एन पक्षाकडून अल्पसंख्यांक कोट्यातून दुसर्यांदा खासदारपदी निवडून आले होते.