Breaking News

पथकांकडून 25 मंडपांची तपासणी

सोलापूर, दि. 26, ऑगस्ट - शहरात 25 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एकाही मंडळाच्या मंडपाचा वाहतुकीस अडथळा होत नसल्याचा अहवाल दोन तपासणी  पथकांनी दिला आहे. तर तिसर्‍या पथकाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी तीन पथके नेमून तपासणी केली.  सनियंत्रण समितीचे अध्यक्ष, प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी तहसीलदार हणमंत कोळेकर, तहसीलदार विनोद रणवरे तहसीलदार रमेश कदम यांची पथके मंडप  तपासणीसाठी नियुक्त केली. यामध्ये विनोद रणवरे यांनी झोन क्रमांक ते मधील फक्त सहा मंडपांची तपासणी केली तर तहसीलदार रमेश कदम यांनी झोन क्रमांक ते  मधील 19 मंडपांची तपासणी केली. कोळेकर यांनी तपासणीचा अहवाल दिला नाही. त्यांना जगताप यांनी पत्र देऊन विचारणा केली आहे. अहवालावर समिती  सदस्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.