शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीप्रकरणी शाहरुख खानला नोटीस
भोपाळ, दि. 03, ऑगस्ट - एका शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीप्रकरणी शाहरुख खान याच्यासह अन्य चार जणांना भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने आज नोटीस पाठवली. याप्रकरणी 26 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. शाहरुखविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली. नोटीस पाठवलेल्यांमध्ये शाहरुख खानसह मध्यप्रदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नियंत्रक, स्थानिक दुकानाचे मालक आणि शेव्हिंग क्रीम कंपनीचे मालक यांचा समावेश आहे. राजकुमार पांडे याने शाहरुख खान विरोधात ही याचिका दाखल केली आहे.
ते म्हणाले की, देशातील उत्कृष्ट दर्जाची क्रिम आहे असे सांगून शाहरुख खान नागरिकांची दिशाभूल करत आहेत. या क्रिममुळे माझ्या चेह-यावर पुरळ आले. मला यासाठी उपचार करुन घ्यावे लागले. ही क्रीम तपासणीसाठी पाठवली असता ती वाईट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे . हा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर विशेष न्यायाधीश काशीनाथ सिंग यांनी या चार जणांविरोधात नोटीस जारी केली.