Breaking News

पाकिस्तानने आपल्या भूभागाचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी करू देऊ नये - अमेरिका

लाहोर, दि. 21, ऑगस्ट - पाकिस्तानने स्वत:च्या भूभागाचा वापर भारताबरोबरच अन्य शेजारी राष्ट्रांविरोधात दहशतवादी हल्ल्यांसाठी करू देऊ नये, असे  आवाहन अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल जोसेफ वोटल यांनी केले आहे.
आपल्या पाकिस्तान दौ-यादरम्यान वोटल यांनी हे आवाहन केले. या दौ-यात वोटल यांनी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी, संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर,  लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आदींची भेट घेतली. दक्षिण आशियात शांतता रहावी, यासाठी अमेरिका व पाकिस्तान एकत्रित काम करत आहेत.  दोन्ही देशांतील सैन्य संबंध आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे, असेही वोटल म्हणाले.