Breaking News

श्रीलंकेच्या एरंगाला गोलंदाजी करण्यास ‘आयसीसी’कडून परवानगी

दुबई, दि. 20, जुलै - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज शमिंडा एरंगा याला गोलंदाजी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून परवानगी देण्यात आली आहे. एरंगाची  गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्यामुळे परिषदेने त्याच्यावर 20 जून 2016मध्ये बंदी घातली होती. परिषदेची मान्यता असलेल्या चेन्नईतील परीक्षा केंद्रात त्याच्या  गोलंदाजीच्या शैलीची चाचणी घेण्यात आली. त्यात आता त्याच्या गोलंदाजीची शैली परिषदेच्या नियमावलीनुसार योग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परिषदेने  त्याच्या गोलंदाजीवरील बंदी उठवली. दरम्यान, पुढील सामन्यांमध्ये जर एरंगाची गोलंदाजी शैली अवैध किंवा संशयास्पद दिसून आली तर पंचांना याबद्दल तक्रार  करण्याची मुभा देण्यात आली आहे.