Breaking News

पहिल्या फेरीतील मतमोजणीत कोविंद आघाडीवर

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - देशाचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार हे आज स्पष्ट होणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल. संसद भवनाच्या हॉल क्रमांक 62 मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद तर यूपीएकड़ून मीरा कुमार रिंगणात आहेत.
सुरुवातीच्या कलानुसार एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद पुढे आहेत. पहिल्या फेरीतील मतमोजणी पू्र्ण झाली असून रामनाथ कोविंद यांना 60 हजार 683 मतं मिळाली आहेत. तर मीरा कुमार यांच्या पारड्यात 22 हजार 941 मतं पडली आहेत.