Breaking News

विजय मल्ल्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पथक लंडनमध्ये दाखल

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - उद्योगपती विजय मल्ल्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी सक्तवसुली संचनालयाचे पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. या पथकात  सहसंचालक दर्जाचा कायद्याचा सल्लागाराचाही समावेश आहे. हे पथक भारतातून सोमवारी लंडनला जाण्यासाठी रवाना झाले होते. दोन दिवस लंडनमध्ये थांबून ते  मल्ल्यावरील आरोपपत्र दाखल करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करून गुरुवारी पुन्हा भारतात परतणार असल्याचे सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा खटला चालवणार्‍या क्राऊन प्रॉसेक्युशन कार्यालयाकडे मल्ल्याविरोधातील 5 हजार 500 पानांचे आरोपपत्र आणि इतर काही कागदपत्रे  सक्तवसुली संचनालयाने सादर केली आहेत. या आरोपपत्रात मल्ल्याविषयी सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे. कायदा सल्लागार मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी  लंडनमधील ब्रिटीश लवादासोबत करार करणार आहेत, अशी माहिती सक्त वसुली संचालयाच्या भारतातील अधिकार्‍यांनी दिली.