Breaking News

खा. दिवाकर रेड्डी यांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवली

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - तेलगू देसम पार्टीचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांच्या विमान प्रवासावरील बं दी इंडिगो कंपनीकडून अखेर उठविण्यात आली आहे.  त्यामुळे आता त्यांना विमान प्रवास करता येणार नाही.
विशाखापट्टणम विमानतळावरुन हैदराबादला जात असताना दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर गोंधळ घातला होता. रेड्डी हे विमानतळावर उशिरा  पोहचले. त्यानंतर चेक इन काऊंटर बंद झाले होते. त्यामुळे रेड्डी यांना प्रवास करता आला नाही. त्यामुळे रेड्डी यांनी संतापून कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली होती.  त्यानंतर इंडिगो एअरलाईन्ससह एअर इंडिया, स्पाईस जेट, जेट एअरवेज, विस्तारा, गो एअर, एअर एशियाने या कंपन्यांनी रेड्डी यांच्यावर बंदी घातली.
यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमानात कर्मचार्‍याशी वाद घातला असल्यामुळे त्यांच्यावर विमान प्रवासाची बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी  उठवण्यात आली होती.