Breaking News

अखिलेश सरकारच्या काळातील भरती घोटाळ्याची चौकशी होणार

लखनौ, दि. 20, जुलै - अखिलेश यादव सरकारच्या काळात प्रशासकिय अधिका-यांच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी  आदित्यनाथ यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. समाजवादी पक्षाने सरकारी व्यवस्थेमध्ये होणा-या प्रत्येक भरती प्रक्रियेत घोटाळा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात  आले.  लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल यादव यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करण्यात आली . 
या प्रक्रियांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. या कारणास्तव उच्च न्यायालयाने त्यांची नियुक्ती अवैध ठरविली होती.
प्रांतीय नागरी सेवा (पीसीएस) 2011 ते 2015 पर्यंतची भरती डॉ. अनिल यादव यांच्या कार्यकाळात झाली. अन्य शासकीय पदांसाठीच्या परिक्षादेखील झाल्या  होत्या. अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात पीसीएस द्वारे 2011 ते 2015 मध्ये अडीच हजार पदांसाठी भरती करण्यात आली होती.