Breaking News

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी तीन दिवसात स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले. भारतीय  जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेते शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली  आहे. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार आहे.
पुष्कर मृत्यूप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी स्वामी यांनी याचिकेत केली आहे. या पथकामध्ये  गुप्तचर विभाग, सक्तवसुली संचनालय आणि दिल्ली पोलिसांचा समावेश करण्यात यावा, असेही त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.