Breaking News

मालेगाव जवळील पाटणे फाट्यावर अपघात; आई व मुलाचा मृत्यू

नाशिक, दि. 01 - येथील पाटणे फाट्या जवळ काल दि29 जून सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. गतिरोधक जवळ गाडीचा वेग कमी झाल्यामुळे विचित्र  असा तिहेरी अपघात पाटणे फाटा येथे घडला यात मायलेकाचा समवेश असून चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिककडून स्विफ्ट कारने द्वे कुटुंब धुळ्याकडे जात  असतांना पाटणे फाट्या जवळ गतिरोधकपुढे जाणार्या कंटेनरवर स्विफ्ट कार आदळली. याचवेळी पाठीमागून येणार्‍या एक्सयुव्ही गाडी कारवर आदळल्याने झालेल्या  विचित्र तिहेरी अपघातात प्राची चिंतन द्वे, रुची शाह व शिवाय चिंतन दवे या एक वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडला. त्यात धुळ्याचे 3 तर चालक हा नाशिकचा  असल्याची माहिती मिळाली आहे. गतिरोधकाजवळ ब्रेक मारल्यानंतर कंटेनरने चालक साईडकडून या कारला जोरात धडक दिल्याने आहा अपघात झाला यात  कारमधील चालकासह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.