Breaking News

नाशिककरांच्या ग्रीन रिवोल्युशन अंतर्गत वृक्षारोपण सोहळा

नाशिक, दि. 01 - लोकसहभागातून नाशिक शहरालगत वनीकरण करून आनंदवन निर्माण करण्याच्या हेतूने सुरु झालेल्या नाशिक ग्रीन रिवोल्युशन येत्या रविवारी  (दि. 2 जुलै) सकाळी 7 वाजेपासून ’आनंदवन 2017’ वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबक रोड वरील वासाळी फाटा येथील खादी ग्रामोद्योग  विभागाच्या जागेत केंद्र सरकारच्या परवानगीने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. नाशिककरांना या मोहिमेत सहभागी होण्याची संधी असून प्रत्येकाने काही वृक्ष रोपण  करून ती दत्तक घ्यायची आहेत. नाशिक ग्रीन रिवोल्युशनसोबत काम करून ही झाडे मोठी होईपर्यंत काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावयाची आहे.
रविवारी होणा-या नाशिक ग्रीन रिवोल्युशन संस्थेकडून सुमारे 5000 खड्डे खोदण्यात आली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या 25 ते 30  जणांच्या या टीमने मे महिन्यात हे खड्डे खोदण्यात आले आहेत. आता ही टीम 150 ते 200 लोकांपर्यंत वाढली आहे. या सर्वांनी टिकाव व पावडे हातात घेऊन झाडे  लावण्यासाठी खड्डे खोदले आहेत.
लोकसहभागातून वनीकरण, राखु पर्यावरणाचे संतुलन, सुधारू मानवी जीवन हे ब्रीद सोबत घेऊन दीड वर्षांपूर्वी नाशिक ग्रीन रिवोल्युशन ही चळवळ उभी आहे.  डॉक्टर शिक्षक व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते असे विविध क्षेत्रातील 20 ते 30 पर्यावरप्रेमी नागरिक सोबत येऊन गेल्यावर्षी 2016 मध्ये 1 जुलै रोजी  वनविभागाकडून टेकडी दत्तक घेत तब्बल 5500 खड्डे चुंचाळे व 2200 तवली फाटा येथे श्रमदानातुन 7000- 8000 वृक्षारोपण झाले व संगोपनासाठी सतत अविरत  वर्षभर 20 ते 30 लोकांनी नेटाने परिश्रम घेवुन त्या रोपांची काळजी घेतली. आठवड्यातुन 2 तास श्रमदान देवून एका वर्षात 7000 वृक्षलागवड व संगोपण करण्यात  यश मिळवले आहे. पुढील तीन वर्षे या झाडांची काळजी घेण्यात येणार असून त्याती 90 टक्के झाडे आज मोठी झाली आहेत. या मोहिमेसाठी रोटरी क्लब नाशिक,  महिंद्रा अंड महिंद्रा, टलास कॅपको या कंपनींचेही सहकार्य लाभले आहे.
पर्यावरणाचा र्‍हास था असेल तर सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन काम करणे आवश्यक असून सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होऊन निसर्गसंवर्धनाप्रती  बांधिलकी जपण्याचे आव्हान ग्रीन रिवोलुशन तर्फे करण्यात आले आहे.