Breaking News

कुख्यात गँगस्टर आनंदपाल सिंग याचा मृतदेह कुटुंबियाकडे सुपुर्द

जयपुर, दि. 02 - राजस्थानातील कुख्यात गँगस्टर आनंदपाल सिंग याचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबियाकडे सोपवण्यात आला. शनिवारी पोलिसांबरोबर झालेल्या  चकमकीत आनंदपाल सिंग याला ठार करण्यात आले होते. आनंदपाल सिंग याचा मृतदेह शुक्रवारी पुन्हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. उद्या त्याच्यावर  अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
आनंदपालच्या मृत्यूनंतर त्याचे मुळगाव सांवरादमध्ये संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यात अनेक जण जखमी झाले होते. त्याचा मृतदेह ताब्यात  घेण्यास कुटुंबियांकडून नकार देण्यात आला होता. मात्र आता त्यांनी मृतदेह स्वीकारला असल्याचे सांगण्यात येत आहे.