Breaking News

मुंबईमधील साध्वीने केला बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या दोघांवर छेडछाडीचा आरोप

देहरादून, दि. 02 - मुंबईतील एका साध्वीने बद्रीनाथ मंदिराचे माजी मुख्य पुजारी आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर छेड  काढल्याचा आरोप केला आहे. पुजा-यांचे नाव विष्णू प्रसाद नंबूगिरी असून बी.डी.शर्मा असे मुख्य कार्यकारी अधिका-यांचे नाव आहे. 
या दोघांनी बद्रीनाथ येथील प्रख्यात मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी आली असताना माझी छेड काढली असा आरोप त्या महिलेकडून करण्यात आला आहे. ही  घटना जून महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी  सांगितले.
तसेच या दोघांनी मला धमकी दिली. तसेच ते माझी मुंबईतील संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही तिच्याकडून करण्यात आला आहे.