Breaking News

देशातील 1 लाख बनावट कंपन्या बंद; 3 लाखांहून अधिक नोंदणीकृत कंपन्या संशयाच्या भोव-यात : पंतप्रधान

नवी दिल्ली, दि. 02 - निश्‍चलीकरणाच्या निर्णयानंतर देशातील सुमारे 1 लाख नबावट कंपन्यां बंद करण्यात केंद्र सरकारला यश आले असून 3 लाखांहून अधिक  नोंदणीकृत कंपन्या या नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी संशयाच्या भोव-यात आहेत, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. देशभरात  ‘जीएसटी’ची अंमलबजावणी झाल्यानंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. नवी दिल्लीत ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ  इंडिया’च्या कार्यक्रमात सनदी लेखापालांना ते संबोधित करत होते.
ते म्हणाले की, कोणताही देश मोठ्यात मोठ्या संकटातून स्वतःला वाचवू शकतो. 8 नोव्हेंबरला निश्‍चलीकरणाचा निर्नय जाहीर करण्यात आला. त्यानंतर सनदी  लेखापालांचे काम खूपच वाढले असल्याच्या बातम्या माझ्या कानावर आल्या. पण, माझ्या आणि तुमच्या देशप्रमात तसूभरही फरक नाही. त्यामुळे प्रत्येक सनदी  लेखापालाने आपाल्याशी संबंधित व्यापा-यांना योग्य मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला द्यावा आणि त्याचाच आग्रह धरावा.
निश्‍चलीकरणानंतर भारताला काय फायदा झाला, असे प्रश्‍न सर्रास विचारले जातात. याबाबत बोलयचे झाले तर ताज्या आकडेवारीनुसार परदेशातील काळा  पैशाविरोधात केलेल्या कारवाईमुळे स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 45 टक्क्यांनी कमी झाला आहे, असे स्विस बँकेकडून देण्यात येणा-या अहवालात स्पष्ट करण्यात  आले आहे, असे मोदी म्हणाले.
तसेच, सध्या 37 हजार बनावट कंपन्यांच्या मार्फत नियमबाह्य पद्धतीने काळा पैसा पांढरा केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भातील अधिक  लोकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. कारण हे ‘अर्थव्यवस्थेतील स्वच्छता अभियान’ आहे, असेही मोदींनी नमूद केले.