Breaking News

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला जातीय वळण देणे लज्जास्पद - मीरा कुमार

नवी दिल्ली, दि. 02 - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला जातीय वळण देणे लज्जास्पद आहे, असे विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी म्हटले  आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांनी व मी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला जातीय रंग दिला गेला.  दलित विरूद्ध दलित असा जातीय रंग दिला गेला, असे त्या म्हणाल्या.
17 विरोधी पक्षांनी संपूर्ण सहमतीने मला राष्ट्रपती पदाची उमेदवार म्हणून निवडले. विरोधी पक्षाची ही एकता वैचारिक पायाच्या आधारे आहे, असेही त्या म्हणाल्या.  मीरा कुमार या माजी उपपंतप्रधान दिवंगत दलित नेते जगजीवन राम यांच्या कन्या असून लोकसभाध्यक्ष पद भूषवणा-या त्या पहिल्या दलित महिला होत्या. सध्या  मीरा कुमार यांच्या पाठिशी काँग्रेससह 17 पक्षांचे बळ आहे. आप अर्थात आम आदमी पार्टीनेही मीरा कुमार यांनाच पाठिंबा दिला आहे.