Breaking News

वस्तू आणि सेवा कर सामान्य जनतेसाठी ओझे ठरणार - पी. चिदंबरम

नवी दिल्ली, दि. 02 - वस्तू आणि सेवा कर सामान्य जनतेसाठी ओझे ठरणार आहे. लघुउद्योजक आणि छोट्या व्यापार्‍यांना या कर प्रणालीने मोठे नुकसान होणार,  असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.
वस्तू आणि सेवा कराची मूळ संकल्पना वेगळी होती. प्रत्यक्षात अमंलबजावणी करताना त्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वस्तू महाग होणार  आहेत,असेही ते म्हणाले. नव्या कायद्यात नफेखोरीला आळा घालण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या माध्यमातून अधिकार्‍यांच्या हाती आयतेच कोलीत  सापडणार आहे, असेही ते म्हणाले. 80 टक्के वस्तू आणि सेवांवर कर लागणार आहे. त्यामुळे किंमतीत वाढ होणार. महागाई आणखी वाढणार. याबाबत सरकार काय  करणार आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.