Breaking News

आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर सैय्यद सलाउद्दीनने केली अमेरिकेवर टीका

नवी दिल्ली, दि. 02 - अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्यानंतर हिज्बुल मुजहिद्दीनचा म्होरक्या सैय्यद सलाउद्दीनने अमेरिकेवर टीका करत  काश्मीरमधील सशस्त्र लढ्यास आपले समर्थन कायम असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे तो म्हणाला. शनिवारी त्याने  घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने हे वक्तव्य केले.
माझे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करणे ही अमेरिका दौ-यावर आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली भेट होती, असेही तो  म्हणाला. मला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करताना त्यांना पुरावा देता आला नाही. त्यामुळे अशा निर्णयाने आमच्यात फरक पडणार नाही, असेही तो  म्हणाला.