Breaking News

उ.प्रदेशमधील कावड यात्रेच्या सुरक्षेसाठी कमांडो पथके

लखनौ, दि. 21, जुलै - उत्तर प्रदेशमधील कांवड यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने गाजियाबाद पोलिसांनी तीन कमांडो पथकांचा बंदोबस्त ठेवला आहे . कावड यात्रेवर  दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आल्याने राज्यातील पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन कमांडोच्या प्रत्येक तुकडीत चार कमांडर असून पहिली तुकडी कोतवाली ते मेरठ मार्ग आणि मेरठ मार्ग ते मनन धाम येथील गस्तीवर असणार आहे. तर दुसरे  पथक मेरठ रोड ते उत्तर प्रदेस सीमा आणि लोनी सीमापर्यंत गस्त घालणार आहे. याप्रमाणेच मोदीनगर-मुरादनगर आणि पाईप लाईन या मार्गावर तिसरे पथक  गस्तीवर असेल. या ठिकाणी श्‍वानपथकेही ठेवण्यात येणार आहेत .
कांवड यात्रेमध्ये येणा-या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरामध्ये भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण महिन्याच्या  सुरुवातीला उत्तर प्रदेश आणि जवळपासच्या राज्यातील नागरिक गंगाजल घेऊन हरिद्वारला रवाना होतात.