Breaking News

’इंदू सरकार’विरोधात काँग्रेसची तीव्र निदर्शने

औरंगाबाद, दि. 21, जुलै - इंदिरा गांधी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणा-या मधुर भांडारकर निर्मित ’इंदु सरकार’ चित्रपटाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. बुधवारी  सकाळी बाराला क्रांती चौकात शहर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली आहे. या वेळी बोलताना शहराध्यक्ष नामदेव पवार म्हणाले, की मधुर भांडारकर यांनी  चित्रपटात इंदिराजींची प्रतिमा नकारात्मक रंगवली आहे. हा चित्रपट शहरातील कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ देणार नाही. भांडारकरला शहरात पाऊल ठेवू  देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात समशेरसिंग सोढी, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष अनिल माळोदे, शहर उपाध्यक्ष एम. ए. अजहर, सोशल मीडियाचे  पवन डोंगरे, इब्राहीम पठाण, बाबा तायडे, सुरेखा पानखडे, खालेद पठाण, गुलाटी, दीडवाले, जाधव, इकबालसिंग गिल, तुपे पाटील, कैसर बाबा, भाऊसाहेब जगताप  गटनेते, मुनेर पटेल, पंकजा माने, उज्ज्वला दत्त, बाबुराव कवसकर, मनपा गटनेते भाऊसाहेब जगताप आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.