Breaking News

तेज प्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द

पाटणा, दि. 21, जुलै - राज्याचे आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.. भारत पेट्रोलियमने (बीपीसीएल) तेज प्रताप  याच्या पेट्रोल पंपचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र आता न्यायालयाने स्थगिती आदेश मागे घेत पेट्रोलपंपाचा परवाना रद्द  केला आहे. ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तेजप्रताप यादव यांचा पेट्रोल पंप पाटणामधील बेउर भागात आहे.
तेजप्रताप यादव यांनी एकाच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवत भारत पेट्रोलियमकडून पेट्रोल पंपाचा परवाना मिळविला असा आरोप करण्यात आला होता. या  आरोपांची भारत पेट्रोलियमकडून चौकशी करण्यात आली .आणि त्या नंतर तेज प्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यात आला.