Breaking News

अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी वैद्य; आवारी सचिवपदी

अकोले, दि. 01 - दुर्गम आदिवासी क्षेत्रात रोटरीचे सामाजिक कार्य पोहचविण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब अकोलेची स्थापना करण्यात आली असून क्लबच्या संस्थापक अध्यक्षपदी अमोल वैद्य यांची तर सचिवपदी सचिन आवारी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती क्लबचे सल्लागार सुनील कडलग यांनी दिली आहे.
तसेच रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक नवनिर्वाचित कार्यकारीणीत अध्य अमोल वैद्य, सेक्रेटरी सचिन आवारी, उपाध्यक्ष तुषार सुरपुरीया, ट्रेझरर सचिन देशमुख, सार्जंट अ‍ॅट आर्म्स रविंद्र वाकचौरे, सहसचिव प्रा. डॉ. सुरेंद्र वावळे, क्लब एडमिनिस्ट्रेशन आसिफ शेख, मेंबरशीप डेव्हलपमेंट श्रीकांत नाईकवाडी, सर्व्हिस प्रोजेक्ट सुधीर गडाख, दत्तात्रय वाळुंज, सुधीर फरगडे, डॉ.विष्णू बुळे, आर्कि.चेतन नाईकवाडी, निलेश देशमुख आदींची नियुक्ती करण्यात आली. याबरोबर रोटरी क्लबमध्ये बाळासाहेब भोर, विक्रम नवले, नोटरी बी. जी. वैद्य, रविंद्र चोथवे, डॉ.रविंद्र डावरे, डॉ.जयसिंग कानवडे, अभिजित पन्हाळे, मारूती भिंगारे, दीपक देशमुख, प्रविण देशमुख, डॉ. सुजित खिलारी, विद्याचंद्र सातपुते, मुन्ना धुमाळ, कल्पेश वराडे, सुनील नवले, प्रविण झोळेकर, किरण कराळे, नामदेव पिचड, राजेश पाडेकर, सुरेश उगले, अरुण सावंत, रोहित गायकवाड, विलास कांबळे यांचा संस्थापक सदस्य म्हणून सहभाग आहे. अकोले तालुक्यातील शासकीय जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शाळा तेथे डिजिटल क्लासरूम प्रकल्प व ग्रामीण भागात मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शिबिरे आयोजित करणे, उपेक्षित आणि वंचित आदिवासींसाठी उपयुक्त प्रकल्प याशिवाय सामाजिक उपक्रम राबविण्यास रोटरी क्लब प्राधान्य देईल असे नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी सांगितले. नवनिर्वाचित  पदाधिकारी व संचालक मंडळाचे जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, हेमंत आवारी, डी. के. वैद्य, अनिल रहाणे, सुर्यभान सहाणे, मगनराव येलमामे, भाऊसाहेब पुंजा वाकचौरे,संतोष साळवे, हेमंत कुसळकर, जगननाथ आहेर, अशोक उगले, सुनील आरोटे, संजय महानोर, नितीश शहा, स्वप्निल शहा आदींनी अभिनंदन होत आहे.