Breaking News

सांगलीत वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी

सांगली, दि. 21, जुलै - सांगली  जिल्ह्यात पावसाचा जोर  कायम  असून  वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी  झाली आहे. कोकरुड-रेठरे, मांगले सावर्डे आणि  मांगले - काखे हे तीन पूल  पाण्याखाली गेल्यामुळे या  मार्गावरील वाहतूक ठप्प  झाली आहे. मांगले - काखे हा पाण्या खाली गेल्याने, कोल्हापूर  जिल्ह्याशी  असणारा संपर्क तुटला. तसेच दुसरी कडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पण वाढ होत आहे. कृष्णा नदीवरील बहे बंधारा पाण्याखाली गेला आहे  नदी काठावर  लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.