Breaking News

पी. चिदंबरम यांचे जीएसटी परिणामाबाबत रविवारी चर्चासत्र

पुणे, दि. 20, जुलै - केंद्र सरकारने 1 जुलैपासून जीएसटी लागू केला आहे. त्याबद्दल जनसामान्यात असंतोष आहे. त्या पार्श्‍वभूमिवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि  माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या चर्चासत्राचे व्यापार्‍यांसाठी रविवारी (23 जुलै) आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश  बागवे यांनी दिली.यावेळी माजी आमदार मोहन जोशी, युवक प्रदेष डॉ. विश्‍वजित कदम, गोपाळ तिवारी, अ‍ॅड. अभय छाजेड, म. वि. अकोलकर आदी उपस्थित होते.  बागवे म्हणाले की, देशातील अनेक शहरातील व्यापारी जीएसटी विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. व्यापारी वर्गात असलेली नाराजी आणि 28 टक्क्यांपर्यंतची करवाढ  आर्थिक विकासाला घातक आहे.जीएसटीच्या एकंदरीत परिणामांची कारणमिमांसा पी. चिंदमबरम या चर्चासत्रात करणार आहोत. रविवारी (23 जुलै) सायंकाळी 4.30  वा. थ्रीडी हॉल, मुकुंदनगर येथे हे चर्चसत्र संपन्न होणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.