Breaking News

मटक्यावर कारवाई; 50 आरोपींना अटक, 40 हजार जप्त

सोलापूर, दि. 20, जुलै - शहरातील अवैध धंदे बंद करण्याची तंबी पोलिस आयुक्तांनी सोमवारी दिल्यानंतर सात पोलिस ठाण्यांपैकी पाच हद्दीत कारवाई झाली.  कारवाई मात्र आश्‍चर्यकारक वाटते. दोन दिवसांत फक्त 23 ठिकाणी कारवाई झाली. 50 संशयितांवर गुन्हे दाखल झाले अन् 40 हजारांच्या आसपास पैसे जप्त  करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्तांनी आदेश दिली म्हणून जुजबी करण्यात आली की खरंच कारवाई झाली, अशी चर्चा होत आहे. कुमठानाका येथे जुगार  खेळताना पकडण्यात आलेल्या 16 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, बुधवारी ती नावे पोलिसांनी दिली. शालम फकरोद्दीन शेख, सद्दाम शौकत कुरेशी, शकूर अब्दुल  शेख, गोवर्धन अर्जुन कलशेट्टी, निलप्पा रूडेसर अडगळे, जहागीर फकीरअहमद कुरेशी, अंकम अवद अरब, अन्वर अलिसाहब अवडी, इलाही महमूद शेख, शकबूर  मडार डांगे, दीपक प्रभाकर संगा, कसिम महमद्दहुसेन सय्यद, दाऊद इस्माईल जकलेर, महेबूब सलीम जकलेर, सविम रफीक मुंडेवाडी, जुबेर अब्दुलरहिम कलबुर्गी  यांच्यासह जुगार अड्डा चालक प्रवीण निकाळजेवर गुन्हा दाखल झाला आहे. ओपनझालेला मटका दोन दिवसांत क्लोज झाला आहे. तो कायमस्वरूपी क्लोज व्हावा.  पोलिस कारवाईमुळे मोबाइलवर मटका घेण्यात येत नाही ना. त्यावरही पोलिसांना लक्ष ठेवावे लागेल. सोमवारी मंगळवारी मटका बुकी प्रवीण निकाळेच्या क्लबवर  कारवाई झाली. अजून एकाही मूळमालकाला अटक झाली नाही, हे विशेष. श्री. तांबडे यांनी पोलिस अधिकार्‍यांना तंबी दिल्यानंतर चालकावर तडीपार करण्यासाठी  प्रस्ताव करण्याचे काम सुरू झाले आहे.