2018 मध्ये विमान प्रवासात इंटरनेटचा वापर करता येणार ?
नवी दिल्ली, दि. 21, जुलै - पुढील वर्षापासून विमानात प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटनेटचा वापर करता यावा यासाठी विमान कंपन्या प्रयत्न करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कंपन्यांच्या इनफ्लाईट कनेक्टिव्हिटी सॅटलाईट कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हाईडर इनमारसॅट आणि भारत संचार निगम लिमिडेट संयुक्तरित्या या प्रकल्पावर काम करत आहेत.
प्रवाशांना इंटरनेट वापरण्याची सुविधा देण्यासाठी आम्ही खासगी कंपन्यासह सॅटलाईट फोन सेवा आणि विमान, जहाजांवर इंटरनेट सेवा पुरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. ही सेवा तात्पुरत्या स्वरुपात लष्करी अधिका-यांनाच देण्यात आली आहे. ही सेवा पुरविण्यात आल्यानंतर प्रवाशांना प्रवासात फेसबुक, व्हॉटस प, इंन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांचा वापर करता येणार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.