Breaking News

रेल्वेच्या अद्ययावतीकरणासाठी जागतिक बँक करणार 5 लाख कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - रेल्वेच्या सुधारणा व अद्ययावतीकरणासाठी जागतिक बँक 5 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. ब्रिटिशकालीन  वाहतुकीचा योजनाबद्ध पद्धतीने चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात येत आहे.
या मदतीअंतर्गत परिवहन, तांत्रिक अद्ययावतीकरण, रेल्वे विद्यापीठ व रेल्वे दर प्राधिकरण तयार करण्याची योजना आहे. या आधीही जागतिक बँकेकडून मदत  करण्यात आली आहे. सुमारे दोन वर्षे चालणा-या या अद्ययावतीकरणाच्या योजनेत जागतिक बँकेचे सल्लागार व कार्यक्रम व्यवस्थापक मदत करणार आहेत. निश्‍चित  वेळेत काम पूर्ण करणे व त्यांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी बँकेचे आर्थिक सहाय्य घेतले जात आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात रेल्वेचा कायापालट  करण्याची योजना तयार करण्यात आली आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिका-याने सांगितले.