Breaking News

गोपाळकृष्ण गांधींना पाठिंबा देण्यावरून प.बंगालमध्ये माकपत नाराजी

कोलकाता, दि. 20, जुलै - उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयामुळे पश्‍चिम बंगालमधील  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील एक गट नाराज आहे.
राज्यपाल असताना गांधी यांनी सिंगूर व नंदीग्राम आंदोलनादरम्यान तत्कालीन बुद्धदेव सरकार व पक्षाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे सरकार व  राज्यपाल यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर माकपच्या राज्य कार्यकारिणीतील काही सदस्य गांधी यांना पाठिंबा देण्याला विरोध दर्शवत  आहेत. काही नेत्यांनी प्रमुख नेत्यांसमोर नाराजीही व्यक्त केली आहे. तर काही जण सोशल मिडियाच्या माध्यमातूनही नाराजी व्यक्त करत आहेत.
हुबळी जिल्ह्यातील सिंगूर भागात भूमी अधिग्रहणाविरोधात तत्कालीन राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या भूमिकेचे उदाहरण कदेत त्यांना पाठिंबा देण्यावर प्रश्‍नचिन्ह  उपस्थित केले आहे. हे अधिग्रहण टाटा मोटर्सच्या नॅनो गाडीचा कारखाना उभारण्यासाठी करण्यात येत होते. तेव्हा नंदीग्राममध्ये भूमी अधिग्रहण विरोधी आंदोलन सुरू  झाले होते. या संदर्भात गांधी यांनी तृणमूल काँग्रेसची बाजू घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.