जम्मूतील डोडा येथे ढगफुटी झाल्याने सहा जणांचा मृत्यू
श्रीनगर, दि. 20, जुलै - जम्मूतील डोडा येथे ढगफुटी झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. यात ढिगा-याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. काल (19 जुलै) रात्री 2.20 मिनीटांनी डोडामधील ठाठरी येथे ढगफुटी झाली असून मृतांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मातीचा मातीचा ढिगारा निवासी भागावर कोसळला .. यात एक कुटूंब अडकल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.