पंढरपुरातही सशुल्क दर्शनाचा घाट
पंढरपूर, दि. 20, जुलै - शिर्डी, तुळजापूर देवस्थानच्या धर्तीवर पंढरपुरातही श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनासाठी शंभर रुपये देणगी शुल्क आकारणी करण्याचा प्रस्ताव मंदिर प्रशासनातर्फे आणला जात आहे. मात्र, या निर्णयास नवीन मंदिर समिती अनुकूल नसल्याची माहिती वारकरी संप्रदाय पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी दिली. या संदर्भात वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून मंदिर समितीवर निवड झालेल्या गहिनीनाथ महाराज औसेकरांशी बोलणे झाले असून असा कोणताही निर्णय समिती घेणार नसल्याचे औसेकरांनी सांगितले आहे.
रामकृष्ण महाराज वीर म्हणाले, मंदिर प्रशासनाने शंभर रुपये देणगी शुल्क आकारून श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाचा फेब्रुवारी महिन्यातच ठराव मंजूर केला आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या मंदिर समिती सदस्यांची पहिली बैठक शुक्रवारी (ता. 21) होणार असून या बैठकीत या ठरावाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार नवनियुक्त समितीमधील सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकरांशी आम्ही संपर्क साधला. त्यानंतर औसेकर महाराजांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर असा कोणताही निर्णय नवनियुक्त मंदिर समितीकडून घेतला जाणार नसल्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे. जर असा कोणताही ठराव बैठकीत आला तर त्याला वारकरी संप्रदायाचा विरोध असेल, अशी भूमिकादेखील आम्ही घेणार असल्याचे औसेकरांनी सांगितल्याचे वीर महाराज यांनी सांगितले.