नाशिक जिह्यात 75 टक्के पेरण्या पूर्ण ; सिन्नला केवळ 32 टक्के पेरण्या
नाशिक, दि. 20, जुलै - मागील आठवडयात जिल्ह्याच्या विविध भागात कमी पाऊस झाला. या पावसानंतरच्या उपलब्ध ओलीवरच खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळे आठवडाभरातच 20 टक्के पेरण्या झाल्या.आतापर्यंत सहा लाख 52 हजार 500 हेक्टर क्षेत्रापैकी 4 लाख 87 हजार 788 हेक्टर क्षेत्रावर (74.75 टक्के) खरीपाच्या पेरण्या झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. आठ तालुक्यात 70 टक्यांच्यावर पेरण्या झाल्या असून सिन्नर तालुक्यात मात्र अवघ्या 32 टक्केच पेरण्या झाल्या आहेत.
जिह्यात यावर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने जून महिन्यात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला. मात्र, सलग 20 दिवस पावसाने जिह्यात पाठ फिरविली होती. त्यामुळे पेरण्या संकटात सापडल्या. काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. पावसाने ओढ दिल्याने जिह्यातील सर्वच भागात पेरणीचा वेग मंदावल्यामुळे मागील आठवडयापर्यंत जिह्यात केवळ 55 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र, मागील आठवडयात जिल्ह्यात पावसाचे पुन्हा आगमन झाले. सलग तीन दिवस पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मंदावलेला पेरण्यांना पुन्हा वेग आला आहे.
जिह्यात खरीपाचे सहा लाख 52 हजार 500 हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 87 हजार 788 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत.जिह्यात भात लागवडीचा वेग मंदावला असून उशीरा तयार केलेल्या रोपवाटिकांमुळे इगतपुरी, पेठ, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी तालुक्यातील भात लागवडीचा वेग मंदावला आहे. या भागात केवळ 61 टक्के क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. ज्वारी पीकाची 189 हेक्टर, बाजरी एक लाख 4 हजार 521 हेक्टर, मका एक लाख 85 हजार 887 हेक्टर (107 टक्के), भुईमुग 20 हजार 696 हेक्टर, सोयाबीन 44 हजार 272 हेक्टर (78 टक्के), कपाशी 42 हजार 823 हेक्टर (91 टक्के)अन्नधान्य पीके 77 टक्के तर गळीताची पीकांची 66 टक्के पेरणी झाली आहे. पेरणीचा वेग असाच राहिला, तर महिना अखेरीस 100 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 100 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
तालुकानिहाय पेरण्या -
मालेगाव (89.24 टक्के), बागलाण (86.11 टक्के), नांदगाव (10 टक्के), कळवण (90.44 टक्के), देवळा (91.08 टक्के), सुरगाणा (47.48 टक्के), नाशिक (47.53 टक्के), त्र्यंबकेश्वर (71.35 टक्के), इगतपुरी (43.24 टक्के), पेठ (44.20 टक्के), निफाड (67.25 टक्के), सिन्नर (32.30 टक्के), येवला (89.94 टक्के), चांदवड (98.94 टक्के).