Breaking News

जीएसटी : सहा महिने कोणतीही ठोस कारवाई नाही

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - वस्तू व सेवा कर प्रणाली अंतर्गत पहिले सहा महिने महसूल अधिकारी कोणावरही मोठी कारवाई करणार नाहीत, असे केंद्रीय उत्पादन व  सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष वांजा सरना यांनी आज येथे स्पष्ट केले. नव्या कर प्रणालीनुसार उद्योग स्थिर होण्याकडे सरकारचे लक्ष आहे. सुरुवातीला प्रणालीतील  तरतुदी समजेपर्यंत काही त्रुटी राहू शकतात. त्यामुळे तीन ते सहा महिन्यांपर्यंत थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे केंद्रीय उत्पादन कर व सीमाशुल्क मंडळांतर्गत  अंमलबजावणी विभागाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही सरना म्हणाल्या.
नव्या कर प्रणालीत नियमितता व त्यातील नियमांशी अनुकूलता येण्यासाठी काही वेळ उद्योगपती व व्यापा-यांना द्यावा लागेल. त्यांना या टप्प्यात येण्यासाठी  प्रोत्साहन दिले जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही कठोर कारवाई करण्याच्या बाजूने आम्ही आहोत, असेही सरना यांनी स्पष्ट केले.