मध्य प्रदेशातील हिंसाचारामागे काँग्रेसचा हात - शिवराज सिंग चौहान
भोपाळ, दि. 21, जुलै - मध्य प्रदेशात जूनमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे . शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती सरकारला 31 मे रोजी मिळाली होती. दोन जूनपासून सुरू झालेले आंदोलन चार जूनपर्यंत शांततेच्या मार्गाने पार पडले, अशी माहितीही चौहान यांनी दिली.
आमचे सरकार हे शेतक-यांचे सरकार आहे. मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलन दरम्यान उसळलेल्या हिंसाचारा मागे काँग्रेसचा हात आहे. काँग्रेसमुळे या आंदोलनाला हिंसक वळण आले. मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मरण पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली आहे, असेही चौहान यांनी सांगितले.