Breaking News

इंग्लंडचा फलंदाज मायकल लंब दुखापतीमुळे निवृत्त

लंडन, दि. 21, जुलै - इंग्लंडचा सलामीचा फलंदाज मायकल लंब याने घोट्याच्या दुखापतीमुळे तडकाफडकी निवृत्तीची घोषण केली आहे. देशांतर्गत कौंटी क्रिकेट  स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर झालेल्या तपासणीत दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून त्याला क्रिकेट न खेळण्याचा सल्ला देण्यात आला.
क्रिकेटमधून निवृत्त होताना मला अत्यंत दु:ख होत आहे. विशेषत: स्पर्धेच्या मध्येच अशी तडकाफडकी निवृत्ती स्वीकारावी लागत असल्याचे वाईट वाटत आहे. पण  मला देण्यात आलेल्या वैद्यकीय सल्ला मी ऐकायला हवा. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे, असे लंबने सांगितले. लंबने 27 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यात  इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. तसेच, कौंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायर, हॅम्पशायर आणि नॉटिंगहॅमशायर या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले.