ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमचा साठा भारताकडे रवाना
नवी दिल्ली, दि. 21, जुलै - भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एका व्यावसायिक करारानुसार ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम रवाना झाले असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री जुली बिशप यांनी येथे बोलताना सांगितले. बिशप सध्या दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत .
ऑस्ट्रेलियाकडून भारताला पहिल्यांदाच युरेनियमचा साठा मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाहून हा साठा भारताच्या दिशेने रवाना झाला आहे. भारताची अणूशक्ती वाढवण्यासाठी सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रणनीतीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. चीनकडून आक्रमक धोरणाचा वापर केला जात आहे. मात्र चीनने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन केले पाहिजे. दोन देशांतील सीमा वाद शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे. दोन्ही देशांत तणाव वाढू नये. कारण तणावपूर्ण स्थिती शांततेसाठी चांगली नसते, असेही बिशप म्हणाल्या.