Breaking News

मटका- जुगार प्रकरणी पाच टोळ्यातील 33 जण तडीपार

सांगली, दि. 01 - कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणार्या व सर्वसामान्य नागरिकांना वाममार्गास लावण्यास कारणीभूत ठरणार्या जुगार व मटका चालविणार्या सांगली  जिल्ह्यातील आणखी पाच टोळ्यातील 33 जणांना दोन वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.  गत दोन दिवसात या कारवाई अंतर्गत एकूण 88 जणांना तडीपार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तडीपार करण्यात आलेल्यात सतीश पवार, बबलू उर्फ विलास गर्जे- पाटील, फिरोज पठाण, बबन उर्फ मुबारक मुजावर व सुधीर शिंदे या पाच टोळ्यांचा समावेश  आहे. सतीश पवार याच्या टोळीविरोधात 15, सुधीर शिंदे याच्या टोळीविरोधात 17, बबलू गर्जे- पाटील याच्या टोळीविरोधात 48, फिरोज पठाण याच्या  टोळीविरोधात नऊ, तर बबन मुजावर याच्या टोळीविरोधात 21 गुन्हे दाखल आहेत. या पाच टोळीतील तब्बल 33 जणांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले  आहे.
तडीपार करण्यात आलेल्यात बबन मुजावर, इम्तियाज जमादार, जमीर दंडेखाना, महंमद मुलाणी, संतोष गायकवाड, महेश भिसे, नूरमहंमद शेख, अझरूद्दीन बेग,  निसार मुल्ला, सुधीर शिंदे, शिवराम गडदे, अनिल देसाई, बाबासाहेब शेंडगे, आण्णासाहेब शेळके, विनायक हल्याळे, जावेद शेख, बबलू गर्जे- पाटील, शिवाजी  भजनाईक, भाविन शहा, सुनिल माने, दिलीप पाटील, महादेव धुमाळ, फिरोज पठाण, विक्रम ढोबळे, महादेव कलातगे, फारूख मुजावर, राहूल घोडके, सतिश पवार,  शकील मुल्ला, सुभाष भोसले, नजीर शेख, पांडुरंग जोतावर व अशोक लवटे या 33 जणांचा समावेश असल्याचे दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.