ठाण्यात 5 लाख रुपयांचा गांजा जप्त; दोन जण अटकेत
ठाणे, दि. 21, जुलै - ठाण्यात आज 43 किलो गांजासहित दोन जणांना अटक करण्यात आली. नकुलसिंग राजपूत आणि महेंद्र सिंग राजपूत अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ही मूळचे सोलापूर येथील रहिवासी आहेत.
जप्त करण्यात आलेल्या गांजाचे बाजार मुल्य 5 लाख 24 हजार 600 इतके आहे. हे दोघे मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. इतका गांजा या दोघांनी कुठून आणला आणि ते हा कोणाला विकण्यासाठी नेत होते, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.