मिसा भारती यांच्या सनदी लेखापालविरोधात ’ईडी’कडून आरोपपत्र दाखल
पाटणा, दि. 21, जुलै - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या आणि खासदार मिसा भारती यांचे सनदी लेखापाल राजेश अग्रवाल यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले. संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अग्रवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे मिसा भारती यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. काळा पैसा पांढरा केल्याच्या आरोप अग्रवाल यांच्यावर आहे. यानंतर दिल्लीतील एका न्यायालयाने अग्रवाल यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले.