Breaking News

पुण्याचा धारण पाणीसाठाही 14 टक्क्यांवर

पुणे, दि. 01 - पवना धारण परिसरात 1 ते 30 जून सकाळी 6 वाजेपर्यंत 668 मिमी पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे पवना धरण महिनाभरात 30.56 टक्के  भरले आहे. तर गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 4 ही धरणाचा मिळून पाणीसाठा 14.33 टक्के झाला आहे.
गेल्या 24 तासात पवना धरणात 129 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणी साठा 2.576 टिएमसी म्हणजेच 30.56टक्के झाला आहे. तर गेल्या  पाच दिवसात धारणाच्या पाणीसाठ्यात 7.85 टक्क्यांची वाढ झाली आहे.
पुण्यातील चारही धरणात काल संततधार पाऊस झाला, गेल्या 24 तासातील पाऊस पुढील प्रमाणे
खडकवासला- 31 मिमी
पानशेत -78 मिमी
वरसगाव- 80 मिमी
टेमघर- 127 मिमी
यामुळे चारही धरणातील उपयुक्त पाणीसाठा 4.19 टिएमसी म्हणजेच 14.33 टक्के झाला आहे.गेल्यावर्षी 30 जून अखेर 1.48 टिएमसी म्हणजेच 5.08 टक्के  पाणीसाठा होता. त्यामध्ये या वर्षी 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.