Breaking News

पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न


पुणे,दि.26 : दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत ब्लँकेटने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अविनाश खंडागळे, असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने एक कुटुंब प्रवास करत होते. मात्र, चालकाला झोप अनावर झाल्याने, द्रुतगती मार्गावरील ताजे पेट्रोल पंपाजवळ त्यांनी गाडी थांबवली. चेह-यावर पाणी मारून झोप उडवण्याचा प्रयत्न करत असताना, मागून एका गाडीत आठ अज्ञात आले आणि गाडीत बसलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून ऐवज लंपास केला होता. तळेगाव पोलिसांनी आरोपींच्या तीन तासात मुसक्या आवळल्या होत्या. अविनाश त्यातलाच एक आरोपी आहे. अविनाश देहूरोड ठाण्यात कोठडीत होता. शनिवारी रात्ने ब्लँकेटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. लॉकअप बाहेर थांबलेल्या पोलिसाने हा प्रकार पाहिला. अविनाशला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे असे, देहूरोड पोलिसांनी सांगितले.