Breaking News

ऑस्कर विजेते दिग्दर्शक जॉन एविल्डसन यांचे निधन

लॉस एन्जेलिस, दि. 18 - ऑस्कर विजेते दिग्दर्शक जॉन एविल्डसन यांचे निधन आज वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. रॉकी आणि कराटे कीड या चित्रपटामुळे  ते विशेष लोकप्रिय झाले होते. त्यांचा मुलगा एविल्डसन यांनी ही माहिती दिली. जॉन यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. लॉस एन्जेलिसमधील सिडर-सिनाई  मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथे उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
1976 साली आलेल्या त्यांच्या रॉकी या चितपटाला त्यावर्षी ऑस्करमध्ये एकून 10 नामांकने मिळाली होती. त्यातील सर्वोत्कृष्ठ चित्रपट, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शन व  संकलनासाठीचे पुरस्कार त्यांनी आपल्या खिशात घातले होते. अभ्यासपूर्ण दिग्दर्शनासाठी त्यावेळी सर्वस्तरावर प्रशंसा झाली. 1980 साली आलेल्या त्यांच्या कराटे  कीड या चित्रपटानेही असेच विशेष यश मिळवले. टर्न ऑन टू लव, जोई, द फॉर्म्युला, हॅपी न्यू इयर, इनफेर्नो या सारख्या त्यांच्या अन्य काही चित्रपटांनाही रसिकांनी  पसंती दर्शवली होती.