शेतकर्यांना पुर्णत: कर्ज आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करा
। नालेगाव तलाठी कार्यालयासमोर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या
अहमदनगर, दि. 08 - शेतकरी आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलनास पाठिंबा म्हणून शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नालेगाव येथील तलाठी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांना पुर्णत: कर्ज माफी द्यावी. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात आदि विविध शेतकरी हिताच्या मागण्या करण्यात आल्या.आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, रेखा जरे, संजय घुले, दत्तात्रय राऊत, सारंग पंधाडे, मयुर विधाते, अंकुश विधाते, अर्चना देवळालीकर, अनिल पालवे, चेतन शेलार, अत्तार खान, राहुल कटारे, संजय दिवटे, विकी लिमगीरे, सागर लोखंडे, सुरज विधाते, रवी वाकळे, अतुल पडोळे, संकेत चेमटे, गणेश शिंदे, अंकुश मोहिते, बंटी शिरसाठ आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी सकाळी तलाठी कार्यालया समोर ठिय्या मांडण्यात आला. शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्यसरकार वेळकाढूपणा करत असल्याने राज्यसरकारचा निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख व्यक्तींचे भाषणे होवून, राष्ट्रवादीच्या वतीने तयार करण्यात आलेली बळीराजाची सनद निवेदन स्वरुपात तलाठी तुकाराम भोसले यांना देण्यात आली. यामध्ये शेतकर्यांना संपुर्णपणे कर्ज माफी देवून, 7/12 कोरा करावा. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्या. शेतकर्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा. बी-बीयाणे, खते व औषधे यांचा पुरवठा शासनामार्फत शेतकर्यांना त्यांच्या बांधावर उपलब्ध करुन द्यावे. अल्पभुधारक शेतकर्यांना किमान 3 लाख पर्यंन्तचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने द्यावे. शेतकर्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी व प्रवासाची मोफत सोय करावी. शेतीबरोबर पुरक जोडधंद्यांसाठी विशेष योजना तयार करुन शेतकर्यांच्या उत्पन्नाला हातभार लावावा. आत्महत्याग्रस्त कुंटुंबाची सर्व जबाबदारी शासनाने घ्यावी. शेतीमालाला उत्पादन किमतीच्या दीडपट हमीभाव द्यावा. नैसर्गिक संकटातून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत द्यावी. ठिबक व तुषार सिंचनासाठी प्रोत्साहनपर अनुदान शेतकर्यांना देवून, प्रलंबीत अनुदान त्वरीत उपलब्ध करावे व शेततळ्याच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी या सनदमध्ये करण्यात आली आहे.