Breaking News

दंडकारण्य अभियानांतर्गत थोरात कारखान्याच्यावतीने वृक्षारोपण

संगमनेर, दि. 08 - पर्यावरणाचे संवर्धन सर्व सजीव प्राण्यांसाठी महत्वाचे असून पर्यावरणासाठी वृक्ष लागवडीतून काम करणार्‍या दंडकारण्य अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली आहे. पर्यावरणदिनानिमीत्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या वतीने विविध वृक्षांचे रोपन करण्यात आले. 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या प्रांगणात दंडकारण्य प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे व जि.प.सदस्य व थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सभापती सौ.निशाताई कोकणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, नवनाथ गडाख, बाबासाहेब वर्पे  यांच्या उपस्थित झाडांचे रोपण करण्यात आले.
यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, वृक्षारोपन व संवर्धन हे मानवाची व सजिवसृष्टीची मोठी गरज आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात व जिल्ह्यात पर्यावरण जाणीव जागृती वाढली असून दंडकारण्यातून उभे होत असलेले काम मोठे आहे. जागतीक पर्यावरणाचा धोका वाढला असून यावर वृक्ष लागवड हाच उपाय आहे. वाढते तापमान, कमी पर्जन्यमान यामुळे दुष्काळासारख्या समस्या निर्माण होवु लागल्या आहे. अमृत उद्योग समुहातील व तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये यांनी सक्रीय सहभाग घेत वृक्ष रोपन व संवर्धन केले. यामुळे दंडकारण्य अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. या अभियानामुळे वृक्षलागवडीची संस्कृती वाढली आहे.  स्व.भाऊसाहेब थोरात यांनी दुरदृष्टी ठेवून सुरु केलेल्या दंडाकारण्य अभियानातून भावी पिढी सुखी होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी भाऊसाहेब कुटे म्हणाले, शतकाच्या सुरुवातीला जगात या विषयावर चिंता व्यक्त केली जात आहे. तो म्हणजे पर्यावरण, पर्यावरणाचे संरक्षण झाल्याशिवाय मानव सुरक्षित व सुखी होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील युवक, ग्रामस्थांनी पर्यावरणाचे काम जनआंदोलन चळवळ म्हणून उभे केले पाहिजे.स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियानाचे हे 12 वे वर्ष असून त्याची यशस्वी अंमलबजावणी होत आहे.आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दादांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान ही चळवळ सतत चालू राहीली पाहिजे. लोक सहभाग वाढला पाहिजे. भविष्य कालीन पिढी सुखात राहण्यासाठी सर्वांनी या चळवळीत सहभागी झाले पाहिजे.
यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.