सदाभाऊ खोत यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला
अहमदनगर, दि. 08 - राज्यामध्ये शेतकर्यांना संपावर जाण्याची वेळ येते. हेच सत्ताधार्यांचे अपयश आहे. संप मिटविण्यासाठी जयाजी सुर्यवंशी व सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची दलाली केली. शेतकर्यांच्या मुळावर उठलेले सरकार म्हणजेच फडणवीस शासन आहे. शेतकर्यांच्या जीवावर मंत्री झालेले ना. सदाभाऊ खोत यांनी शेतकर्यांशी गद्दारी केली आहे. त्यामुळे या विश्वास घातकी सरकारला धडा शिकविण्यासाठी व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठा संघटना शेतकरी संपाला पाठिंबा देत आहे असे आवाहन मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावले यांनी केले.
शनिशिंगणापूर येथे अखिल भारतीय मराठा सेवा संघाने मराठा मंथन बैठकीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अ.भा.मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. कृषीराज टकले होते. याप्रसंगी कृषीराज म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या काळात सुर्याजी पिसाळ होते. आता या काळात जयाजी सुर्यवंशी जन्माला आले आहे. याच नेत्यांमुळे शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाही. शेतकरी आत्महत्या ज्या ठिकाणी झाल्या तेथे सांत्वन करण्यासाठी न जाणारे नेतेच हे आंदोलन राज्यात करत आहे. त्यामुळे मंत्री पदाचा राजीनामा ना. सदाभाऊ खोत यांनी द्यावा शेतकरी आंदोलनात उतरावे. याप्रसंगी अ.भा. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफरशी त्वरीत लागु कराव्या अशी मागणी केली.
यावेळी मराठा शेतकरी संघटना प्रदेश अध्यक्ष सुभाष गागरे, छावाचे जिल्हाध्यक्ष सतिष सौदागर, छावा मराठा संघटना राज्य अध्यक्ष अनिल वाघ, छावा क्रांती सेनेचे विश्वनाथ वाघ आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास अ.भा. मराठा सेवा संघाचे जि.कार्याध्यक्ष कृष्णा दरंदले, पाथर्डी ता. कार्याध्यक्ष अंकुश डांभे, शेवशाव ता. अध्यक्ष गौतम म्हस्के, राहुरीचे प्रवीण सोनवणे, श्रीरामपूर ता. अध्यक्ष नितीन कासार, नेवासा ता. अध्यक्ष गणेश सोणवने, कार्याध्यक्ष सतिष शेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.