Breaking News

अफगाणिस्तान, आयर्लंडला कसोटी संघांचा दर्जा; ‘बीसीसीआय’च्या निधीबाबतही तोडगा

दुबई, दि. 23 - येथे आज झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी संघांचा दर्जा देण्यास मान्यता  देण्यात आली. परिषदेच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे दोन संघही कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे आता  कसोटी क्रिकेट क्रमवारीत या संघांनाही क्रमांक देण्यात येणार असून एकूण कसोटी खेळणा-या देशांची संख्या 12 वर पोहोचली आहे.
तसेच, परिषदेच्या नफ्यातील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला देण्यात येणा-या वाट्याबाबतही या बैठकीत तोडगा काढण्यात आला. भारतीय मंडळाला आता  परिषदेकडून 40 कोटी 50 लाखांचा निधी दरवर्षी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. ‘बीग थ्री’ योजनेअंतर्गत भारताला 57 कोटींचा निधी दिला जात होता.  पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या परिचदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा वाट खूपच कमी करण्यात आला होता.