पंजाब विधानसभा सभागृहात ‘आप’च्या आमदारांना धक्काबुक्की
चंदीगड, दि. 23 - पंजाबमधील विधानसभा अध्यक्ष राणा केपी सिंग यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करत त्यांना सभागृहातून बाहेर काढले. विधानसभेतील मार्शल आमदारांना सभागृ नेत असताना झालेल्या धक्काबुक्कीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले . या घटनेदरम्यान आमदार सरबजीत मानुके या बेशुद्ध झाल्या.पंजाब विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून सरकारविरोधात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
आप आमदार सुखपालसिंग खैहरा आणि लोक इंसाफ पक्षाचे सिमरजित सिंग बैंस यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या दोघांना विधानसभेत प्रवेश देऊ नये असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले होते. या दोघांना सुरक्षा कर्मचार्यांनी अडवल्यामुळे आप आमदार आक्रमक होऊन त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. याकारणास्तव विधानसभा अध्यक्षांनी गोंधळ करणा-या आमदारांनाही सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. यामध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये आपचे काही आमदार जखमी झाले. तर आमदार सरबजीत मानुके या बेशुद्ध झाल्या.