Breaking News

विविध नागरि समस्यांबाबत खासदारांनी घेतली आयुक्तांची भेट

नवी मुंबई, दि. 28 - विविध नागरि समस्यांबाबत खासदार राजन विचारे यांंनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. सर्व  समस्यांवर सकारात्मक चर्चा करून त्या सोडविण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती विचारे यांनी पत्रकारांना दिली.
महापालिका क्षेत्रातील गावठाणां भोवतालची गरजेपोटी बांधलेल्या घरांना महापालिकेमार्फत अनाधिकृत बांधकामाच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्या बाबत शासनाने  2015 पर्यंतची घरे संरक्षित करण्याचे धोरण जाहीर केल्याने त्याचा विचार करावा. ठोक मानधनावरील कर्मचा-यांना समान काम समान वेतन देण्यात यावे,  महापालिका शिक्षकांना समान काम समान वेतन देऊन शिक्षक व डॉक्टरांची भरती करण्यात यावी, महापालिकेचे ऐरोली व नेरूळ येथील रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू  करण्यात यावे, महापालिका क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या शाळांना व शाळेच्या मैदानांना तसेच सर्व धार्मिक स्थळांना आकारण्यात येणारा मालमत्ता कर माफ करावा  किंवा सवलतीच्या दरात कर लावावा, शहरातील इमारतींवर बांधलेल्या पावसाळी शेडवर कारवाई करू नये, शहरातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या  इमारतींच्या पुर्नबांधणी धोरणास मंजुरी मिळावी, एमआयडीसी भागातील झोपडपट्टी परिसरात पावसाळी पाणी वाहून नेणा-यांना संरक्षक भिंत बांधण्यात यावी,  शहरातील पूर्वीपासून रहिवाशी वापर असलेल्या घरांमधील व्यवसायांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीसा दिल्या त्या मागे घेण्यात याव्यात आदी बाबत विचारे यांनी  नगरसेवक व अन्य पदाधिका-यां सोबत आयुक्तांची भेट घेतली. तसेच या समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली, त्यावर आयुक्तांनी या सर्व बाबींचा अभ्यास करून योग्य  तो निर्णय घेऊ असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.